टीम इंडियाचं टेन्शन वाढलं ; धडाकेबाज खेळाडूची कॅरेबिअन टीममध्ये एन्ट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे.वेस्ट इंडिजच्या या संघात एका धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे.

वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाविरुद्ध आपला संघ घोषित केला आहे. वेस्ट इंडिज संघात माजी कर्णधार जेसन होल्डरने पुनरागमन केले आहे. 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी होल्डरला संधी मिळालीय. जेसन होल्डर बांगलादेश विरुद्धची T20I मालिका खेळला नव्हता. परंतु क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) निवड समितीने त्याला भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संधी दिली आहे.

मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स यांनी दिलेल्या निवेदनात सीडब्ल्यूआयने म्हटले आहे की, “जेसन हा जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, हे आपण सर्व जाणतो. तो संघात परत आल्याने आम्हाला आनंद होत आहे. जेसनच्या संघात येण्याने संघाला मोठा फायदा होणार आहे.

टी20 वेस्ट इंडिज संघ : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप, शेमार ब्रूक्स, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स.

टी-20 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिष्णो, रवी बिष्णो , भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

वनडेसाठी भारताचा संघ: शिखर धवन (C), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (वीसी), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल , अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *