महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । Shiv Sena Crisis : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य शिवसेना भवनवर ताबा करण्याचं असेल ? दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वत:चीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे.
दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात यश आलेल्या शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वत:ची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतदेखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखण्याचं स्पष्ट आहे.