वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी ; शिंदे गटाचा ‘ठाकरे घराण्याला’ पहिला धक्का,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । शिंदे गटाने शिवसेनेला (shiv sena) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची (Varun Sardesai) युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी (Kiran Sali)यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी बाध्य करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नवी मुंबई महापालिकेचे तीन माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपात सामील झाले आहेत. माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते या तिघांनी शिवसेना सोडून पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश नसून, घरवापसी असल्याची प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे. या माजी नगरसेवकांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील नवी मुंबईमधील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाल्याने नवी मुंबई शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *