गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना दे धक्का, शिंदे गटातील 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे इन्कमिंग सुरूच आहे. पण, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून सेनेला हादरा दिला आहे. आमदारांचा वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण नवी मुंबईमध्ये भाजपनेच शिंदे गटाला धक्का दिला आहे. आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजप मध्ये दाखल झाले आहे. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गवते यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

डिसेंबर 2021 मध्ये नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी रांग लावली होती. जवळपास भाजपचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. या भरतीत नवी मुंबईतील भाजपचे 3 नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *