महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । आधी आमदार फुटले आता खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे. कालपर्यंत जे सोबत होते ते खासदार आपल्याला सोडून जात असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) अस्वस्थ झाले असून आता पक्ष वाचवण्यासाठी पुढे सरसावले आहे. उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.
आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात जावू लागल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी सरसावले. आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. लोकप्रतिनिधी गेले तरी संघटनात्मक पातळीवर मात्र पक्ष मजबूत ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोज बैठकांचा सपाटा लावला आहे. महिनाभरात जिल्हाप्रमुखांशी आज चौथ्यांदा संवाद साधणार आहे. तसंच काही नियमित बैठकांसाठी उद्धव ठाकरे एक वाजता शिवसेना भवनलाही उपस्थित राहणार आहे.
शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा पक्ष सोडून चालले आहे. स्थानिक पातळीवर ठाणे, उल्हासनगर, बदलापूरमध्ये नगरसेवक, पदाधिकारी हे शिवसेनेत सामील झाले आहे.
धक्कादायक म्हणजे, शिवसेनेचे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे ही नव्या गटात जाणार असून नवा गटाचा प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची केली जाणार नियुक्ती करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर मध्यरात्री सर्व खासदारांची बैठक घेतली.
रात्रीच्या जेवणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदार उपस्थित होते. 12 खासदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत थांबलेल्या खासदरांना घेऊन एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.