‘मातोश्री’, ‘सामना’ आणि ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेण्याचा विचारही करू नये ; संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर (Shivsena Bhavan) ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाने (Eknath Shinde Camp) हालचाली सुरु केल्याचे बोलले जाते. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यांची पावले वेगाने पडत आहेत, याविषयी संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. दैनिक ‘सामना’ ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ही व्यवस्था करुन ठेवली आहे. पण एकनाथ शिंदे गटाला महाराष्ट्र तोडायचा आहे, त्यासाठी शिवसेना तोडायची आहे. उद्या शिवसेनेतील फुटीर गट मातोश्रीवरही कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. सत्तेची आणि बेईमानीची भांग पिणारे कुठेही जातात. उद्या हा फुटीर गट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही, असे म्हणायलाही कमी करणार नाही. एवढी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे. परंतु, बाळासाहेबांची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही. फुटीर गटाने ‘मातोश्री’, ‘सामना’ आणि ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेण्याचा विचारही करू नये, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *