मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; आरे कारशेडचा मार्ग मोकळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । आरे कारशेडवरील (Aarey Metro Car Shed) बंदी हटवली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंदी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती. आता ही स्थगिती मुख्यमंत्र्यांनी हटवली आहे.

यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारनं आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर आता आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

मेट्रो 3 चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्यानं लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवानं या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाला सामना करावा लागत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात या मुद्यावरून आमने-सामने आले होते. आरे कॉलनीमध्ये कारशेड करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध केला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) त्यामध्ये आघाडीवर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *