महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । महाराष्ट्रातील भाजपच्या मोठ्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. छायाचित्रांसह तयार केलेला हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी येथील हॉटेल पोलो ऑर्किडचा आहे. यामध्ये एक पुरुष महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला दिसत आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
चित्रा वाघ यांनी एका लोकप्रतिनिधीच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, हा माझ्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. आमची कायदेशीर टीम या प्रकरणी कारवाई करेल.