राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडावर आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच आणली आहे. इकबाल मिरची ही कारवाई करण्यात आली असून, याआधीही या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या मुंबईतच असून, काही वेळापूर्वी ते वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिसले होते.

मालमत्ता विक्रीचा आरोप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने बेकायदा पद्धतीने वरळीमधील तीन मालमत्तांच्या विक्रीचा व्यवहार केला आणि त्यात काळा पैशांचा व्यवहार करण्यात अनेकांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

पटेल पवारांचे निकटवर्तीय

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार यांच्यानंतर अतिशय महत्त्व असते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानोड्डाण मंत्रीही होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *