![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांतील अंतर ९५ किमीने कमी होणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरण्यासाठी पाच किमी लांबीची दोन एअर स्ट्रीप देखील असणार आहे. तसेच ‘वे. साइड’ सुविधांमुळे महामार्गाच्या बाजूलाच चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क, हॉटेल अशा सुविधा असतील. महामार्गाच्या दुतर्फा मोठी झाडे देखील लावली जाणार आहे. एअर स्ट्रीप असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असेल.
देशांतील निवडक मार्गावर ‘भारतमाला’ परियोजना दोन अंतर्गत जवळपास तीन हजार किमीचे रस्ते बांधले जात आहे. हे सर्व रस्ते ग्रीनफिल्ड असतील. यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील डीपीआरचे काम येत्या काही दिवसांत संपणार आहे. येत्या काही महिन्यांत कर्नाटक राज्यात सुरु असलेले काम देखील संपण्याची शक्यता आहे.
कसा आहे पुणे-बेंगळुरू प्रकल्प?
१. वारवे बुद्रुकपासून ग्रीनफिल्ड सुरू
२. सहा लेन
३. संपूर्ण रस्ता डांबरी. सिमेंटचा वापर नाही.
४. १०० मीटर रुंदी (पुणे-मुंबई द्रुतगती मार्गापेक्षा मोठा)
५. ७४५ किमीचा मार्ग (आताचा मार्ग ८४० किमी)
६. सांगली, सातारा, कोल्हापूर यासह अन्य शहरातून हा मार्ग थेट जाणार नाही.
७. वाहतूक कोंडीचा फटका बसणार नाही
८. ताशी १२० किमी वेग अवघ्या सात ते आठ तासांत बंगळूरला पोचता येईल (आता ११ ते १२ तासांचा वेळ लागतो)
८. टोल स्टेशन वरून जवळच्या गावांना जाण्यासाठी रस्ता असेल
९. एक्ससेस कंट्रोलमुळे रस्त्यावरील वाहने थेट महामार्गावर येऊ शकणार नाही. परिणामी अपघात, वाहतूक कोंडी टळेल
१०. वाहतूक बाधित न होता आपत्कालीन परिस्थिती विमान थेट महामार्गावर उतरविण्यासाठी पुणे व बेंगळुरू जवळ पाच किमीची एयरस्ट्रीप असणार
११. एकूण प्रकल्पासाठी सुमारे ३१ हजार कोटींचा खर्च