महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची वाढती आपत्ती लक्षात घेता सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि एका अदृश्य शत्रूशी (कोरोनाव्हायरस) सामोरे जाण्यासाठी असा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वीट करत, मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यानुसार इतर कोणत्याही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.
सीएनएनच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा या कार्यकारी आदेशावर सही केली आहे. त्यानुसार जोपर्यंत कोरोना संसर्गाची प्रकरणे पुढे येत राहतील, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते बंद असेल. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की कोरोना केवळ विमानतळांद्वारे म्हणजेच परदेशातून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत पोहोचली आहे. त्यामुळे देशाचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी आता इतर कोणत्याही देशातील नागरिकांच्या देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.