महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिका शुक्रवारपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू होत आहे. याआधीच टीम इंडियाच्या अडचणीत वाढ वाढवणारी बातमी समोर आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. संघाची कमान शिखर धवनच्या सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल. मात्र पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. वनडे मालिकेसाठी जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. सराव सत्रात सहभागी झाला नाही, त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत धवनने जडेजाच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, भारतीय अष्टपैलू खेळाडू जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती आहे, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक पाहत आहे.
जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर होऊ शकतो. टी-20 विश्वचषक पाहता बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून जडूच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नाही. एकदिवसीय मालिकेसाठी दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो.