महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । सुदिपकुमार देवकर । महाराष्ट्र राज्यांचे नुतन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे लहुजी शक्ती सेनचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीभाऊ गायकवाड,ऊस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष मारूतीभाऊ क्षिरसागर, प्रविण क्षिरसागर यांनी भेट घेऊन अभिनंदन व सत्तास्थापने बद्दल शुभेच्छा दिल्या तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी लहुजी शक्ती सेनेच्या सामाजिक कार्यांचे कौतुक केले व मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.