महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्र सरकारने ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवली आहे. त्यासाठी सरकारने झेंडा संहितेत बदल केला असून आता 24 तास आपला तिरंगा झेंडा डौलाने फडकणार आहे. याआधी फक्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच झेंडा फडकवण्याची परवानगी होती.
आतापर्यंत हस्तकलेद्वारे, सुती, सिल्कचा झेंडाच फडकवण्यास परवानगी होती. मात्र नव्या नियमानुसार आता पॉलिएस्टर आणि मशीनद्वारे तयार केलेला झेंडाही फडकविता येणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आज सर्व केंद्रीय मंत्रालय आणि सचिवांना पत्र पाठवून या नव्या संहितेबाबत कळवले आहे.