महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । साेलापूर । कोरोना (corona) महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद असणारी पुणे (pune) – सोलापूर (solapur) ‘इंद्रायणी एक्सप्रेस’ (indrayani express) ही कांही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात सुरु करण्यात आली होती. परंतु ही एक्सप्रेस पुन्हा नऊ ऑगस्टपर्यंत ठेवण्याचा निर्णय रेल्वे (railway) प्रशासनाने घेतला आहे. (indrayani express latest marathi news)
पुणे – सोलापूर ‘इंद्रायणी एक्सप्रेस’ कांही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आली हाेती. प्रवाशांनी या एक्सप्रेसचं वाजत – गाजत स्वागत केलं होतं. त्यानंतर या एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
दरम्यान अवघ्या पाच दिवसातच भिगवण – वाशिंबे यार्ड रिमोल्डिंग आणि रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरु केल जाणार आहे. त्यामुळे उद्यपासून (ता. २५ जुलै ते ९ ऑगस्ट) इंद्रायणी एक्सप्रेसच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. यााबतची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यामुळे प्रवाशांत निराशा पसरली आहे. आता पुन्हा एक्सप्रेस बंद राहणार असल्याने याचा सर्वाधिक फटका दररोज रेल्वेने मुंबई, पुण्याला ये- जा करणाऱ्या सोलापूरकरांना तसेच रेल्वेच्या उत्पनास बसणार आहे.