महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut )शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शत होणार आहे. या मुलाखतीवर मनसेच्या वतीने टीका करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक व्यंगचित्र शेअर करत मुलाखतीवर भाष्य केलंय. “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
मनसेची ‘कार्टून’ टीका
संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केलंय. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. “हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं”, असं संजय राऊत म्हणतात. “त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं”, असं उद्धव ठाकरे म्हणतात. विशेष म्हणजे या संभाषणावेळी संजय राऊतांच्या हातात घड्याळ आहे. मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शरद पवार बोलतील तसंच वागत असल्याची टीका होतेय. त्यावर या व्यंगचित्रातून भाष्य करण्यात आलंय.