Weather update : राज्यात पुढील दोन दिवस 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुढचे तीन दिवस 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशार देण्यात आला आहे. के एस होसाळीकर यांनी आज झालेल्या पावसाबाबत ट्वीट केलं आहे.

होसाळीकर म्हणतात, आज राज्यात ३८ टक्के अतिरिक्त आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जादा ते मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.शेतकऱ्यांसह राज्यातील सर्वांसाठी हे चांगले आहे. येत्या काही दिवसांत कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकर्‍यांना त्यांची सर्व शेतीची कामे करण्यास मदतही होईल.

मालेगाव गिरणा नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या एका मच्छीमाराची सुखरुप सुटका झालीय.अग्निशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या कुशीत असलेल्या मेटघर किल्ल्याच्या परिसरात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यात. गेल्या दोन आठवड्यापूर्वी पेठ तालुक्यात असे मोठे मोठे तडे जमिनीला पडले होते. आता ब्रह्मगिरीच्या परिसरातही तडे गेल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

जायकवाडीतून 9500 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणारं आहे. सलग चौथ्या वर्षी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पाण्याचा मराठवाड्यातील शेतीला फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *