स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । Elections to local bodies without OBC reservation say Supreme Court :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत, असे स्पष्ट झालेय. निवडणूक कार्यक्रमात बदलाचा अधिकार नाही, असे न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या जागांवरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं म्हटलं आहे. 367 स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात कुठलाही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही फक्त तारखा बदलू शकता, असं र्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 367 स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. तसेच नियम मोडल्यास अवमानाची नोटीस बजावली जाईल असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *