खासगी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट?; आठवड्यातून ३ दिवस सुट्टी, अन् पगार..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । देशात लवकरच नवीन लेबर कोड(New Labour Code) लागू होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या हे नवीन लेबर कोड लागू करण्यासाठी निश्चित कालावधी नाही. सर्व राज्यांनी नवीन लेबर कोड लागू करावं ही केंद्राची इच्छा आहे.परंतु राज्य सरकारने त्यांच्याकडून ड्राफ्ट फायनल केला नाही. पुढील काही महिन्यांत नवीन लेबर कोड लागू होऊ शकतं. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे.

कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत सांगितले की, बहुतांश राज्याने ४ लेबर कोड ड्राफ्ट नियमात पाठवले आहेत. इतर राज्यांची प्रक्रिया सुरू आहे. नवीन लेबर कोड, सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल रिलेशंस आणि ऑक्यूपेशनल सेफ्टीशी निगडीत आहे.जर ४ बदलांसह नवीन लेबर कोड लागू झालं तर त्यानंतर न्यू वेज कोडतंर्गत खासगी नोकरी करणाऱ्यांना फायदेशीर आहे. सर्वात आधी त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होईल. नवीन वेज कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी पहिल्यापेक्षा कमी मिळेल.

सरकारच्या नव्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी त्याच्या टोटल सॅलरीच्या ५० टक्क्याहून अधिक नसावी. जर बेसिक सॅलरी अधिक असेल तर पीएफ फंडात तुमचं योगदान आधीच्या तुलनेने जास्त होईल.सरकारच्या या नियमाचा निवृत्तीनंतर लाभ होईल. त्यांना मोठी रक्कम मिळेल. त्याचसोबत ग्रॅच्युटीचे पैसेही मिळतील. याचा अर्थ नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या आणखी सक्षम राहील.नवीन लेबर कोड अंतर्गत आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे तास वाढतील. जर आठवड्यात ३ दिवस सुट्टीचा पर्याय निवडला तर दिवसाला १२ तास काम करावे लागेल. म्हणजे आठवड्याचे ४८ तास पूर्ण काम करावे लागेल. त्यानंतर ३ दिवसांचा विक ऑफ मिळेल.

त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सुट्टीत मोठे बदल होतील. कुठल्याही आस्थापनेत काम करताना दिर्घ सुट्टी घेण्यासाठी कमीत कमी २४० दिवस काम करणे गरजेचे होते. परंतु नव्या लेबर कोडनुसार, कर्मचारी १८० दिवस काम करून दिर्घ सुट्टी घेऊ शकतो.फूल अँन्ड फायनल सेटलमेंटबाबत कंपनीतून नोकरी सोडल्यानंतर, काढून टाकल्यावर, राजीनामा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला २ दिवसांत सॅलरी कंपनीकडून दिली जाईल. सध्या वेजेज पेमेंट आणि सेटलमेंटवर खूप नियम आहेत परंतु त्यात राजीनामाचा उल्लेख नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *