महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । ‘जर संजय राऊत (Sanjay Raut ) यांना अटक झाली तर शिवसैनिक खूश होतील. शिवसैनिकांची भावना होती. ज्याने शिवसेना फोडली, त्याने ‘मातोश्री’ला त्रास देण्याचे काम केले त्याच्यावर जर ईडीची रेड झाली तर काही आश्चर्य वाटण्याचे काम नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘गेल्या चार-पाच वेळापासून ईडीने त्यांना समन्स बजावला होता. त्यांची चौकशीही सुरू होती. जर त्यांनी काही केलं नसेल तर ते सुटतील. पण, त्यांनी काही घोटाळे केले आहे, जो भ्रष्टाचार केला आहे, त्यात त्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे’ असा दावाच शिरसाट यांनी केला.
‘जर संजय राऊत यांना अटक झाली तर शिवसैनिक खूश होतील. शिवसैनिकांची भावना होती. ज्याने शिवसेना फोडली, त्याने मातोश्रीला त्रास देण्याचे काम केले त्याच्यावर जर ईडीची रेड झाली तर काही आश्चर्य वाटण्याचे काम नाही’ असंही शिरसाट म्हणाले.
‘ईडी असेल सीबीआय असेल, कायदा आहे. प्रत्येकावर कारवाईही कायद्याने झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही कारवाई झाली आहे. ते कायदेशीर लढाई लढत आहेत तसेच संजय राऊतांनी लढाई लढली पाहिजे. संजय राऊत यांनी तर आव्हानच दिलं आहे, ईडीने आपल्याला अटक करावी. बघूया आता काय होतं, असा खोचक टोलाही शिरसाट यांनी लगावला.