Horoscope Today : “या” राशींना आज दिवस फलदायी ; पहा आजचे राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट ।

मेष
आज अकारण चिंता करू नका. आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल. प्रेरणा देणार्‍या घटना घडतील. कार्यालयीन सहकारी मदत करतील.

वृषभ
आज पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. चिकाटी सोडून चालणार नाही. नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन
आज सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराचे नवीन रूप पहायला मिळेल. हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल.

कर्क
आज व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. आपले गुपित उघडे करू नका.

सिंह
आज नातेवाईकांशी जवळीक वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी पार पाडाल.

कन्या
आजआर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील रुचि वाढवावी लागेल. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल.

तूळ
आज विनाकारण वाद उकरून काढू नका. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा. आज प्रवास घडेल , तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक
आज हातातील काम पूर्ण होईल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल.

धनू
आज प्रयत्नातून यश मिळेल. कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील. कामाची धांदल राहील. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल.आर्थिक फायदा होईल.

मकर
आज इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. मनाची द्विधावस्था टाळावी. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल.

कुंभ
आज प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. भावंडांसाठी तजवीज कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

मीन
आज मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *