महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । 12 मार्च 2022 रोजी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. ‘आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही’, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर ‘आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,’ असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.
तर 12 एप्रिल 2022 रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, “आज पवारसाहेब संजय राऊंतवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.”
त्यानंतर 31 जुलै 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सकाळी सात वाजताच संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानी छापे टाकले. जवळपास नऊ तासांच्या छापा आणि चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. राऊत यांना ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी केली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना अटक केली.
संजय राऊत यांच्या अकटेनंतर राज ठाकरे यांच्या जुनी वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली असून त्यांचं भाकित खरं ठरल्याचं बोललं जात आहे. या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते की काय अशीही चर्चा रंगली आहे.