महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. 9 तास रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली गेली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आता दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले. तर, 2 वाजून 15 मिनिटांनी त्यांना कोर्ट रुम नंबर 16 मध्ये विशेष इडी न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. कोर्टाने आता संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
ईडीचा युक्तीवाद –
– पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत फक्त नावाला होते. हे सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले, असा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीने संजय राऊत यांची ८ दिवसांची ईडी कोठीच मागितली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे, असा दावाही ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला आहे.
– सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान संजय राऊत यांची चौकशी केली जाईल आणि ते त्यांच्या वकीलांना सकाळी ८.३० ते ९.३० या काळात भेटू शकतील