अटीतटीच्‍या लढतीत वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय ; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । अत्‍यंत रोमहर्षक झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये वेस्ट इंडिजने भारताला 5 विकेटने पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने विंडीजला 139 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजने हे लक्ष 19.2 षटकांत 5 गड्यांच्‍या मोबदल्‍यात पूर्ण केले.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 31 चेंडूत 31 धावा केल्या. ओबेड मॅकॉयने वेस्ट इंडिजसाठी घातक गोलंदाजी करताना 6 बळी घेतले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेसन होल्डरने 2 विकेट्स घेतल्या.

मॅकॉयच्‍या गोलंदाजीवर उडाली भारतीय फलंदाजांची भंबेरी
टीम इंडियासाठी एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता मॅकॉयच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला आणि गोल्डन डकवर बाद झाला. मॅकॉयने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. 6 चेंडूत 11 धावा खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही त्‍याने बाद केले. या धक्‍क्‍यातून सावरत नाहीत तोच अल्झारी जोसेफने श्रेयस अय्यरला 10 धावांवर बाद केले. त्‍यांनतर ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली. तो मोठी धावसंख्‍या उभारेल अशी आशा होती. 12 चेंडूत 24 धावा खे करुन तो खेळत होता. पण अकिल हुसेनच्या चेंडूवर ओडेन स्मिथने त्याला झेलबाद केले. हार्दिक पांड्यालाही जेसन होल्डरने 31 धावांवर बाद केले.

खेळाडूंचे सामान न मिळाल्याने सामन्याला उशीर
पहिल्यांदाच टी-20 सामना पावसामुळे नाही, तर खेळाडूंचे सामान न मिळाल्याने उशीर झाला. सेंट किट्समधील बॅसेटेरे मैदानावर हा सामना खेळला जात आहे, मात्र त्रिनिदादच्या खेळाडूंचे सामान सेंट किट्सपर्यंत पोहोचले नाही. यामुळे रात्री 8 वाजता सुरू झालेला सामना 11 वाजता सुरू झाला.

या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *