महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (August-September) राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain forecast) होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण पूर्व विदर्भात मात्र पाऊस कमी असेल असा अंदाज आहे. देशात 106 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे.
शेवटच्या दोन महिन्यांच्या टप्प्यात राज्यात बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता असली, तरी ऑगस्टमध्ये मात्र राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाच्या अंदाजाबाबत जाहीर केलेल्या नकाशांवरुन ही बाब दिसून येते. ऑगस्टमध्ये काही भागांत पाऊस सरासरी पूर्ण करणार नाही. दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
भारतात ऑगस्ट आणि येत्या सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनची (Monsoon) हजेरी ही काही भागात सामान्य तर काही ठिकाणी अतिवृ्ष्टी अशा स्वरुपाची असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या कालावधीत मॉन्सून हा सरासरी 95 टक्के ते 105 टक्के असेल.
ऑगस्टमध्ये मॉन्सून 94 टक्के ते 106 टक्के असा सरासरी असणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात मध्य भारतात सामान्य अशा स्वरुपाचा असणार आहे. तर देशाच्या अनेक भागात सामान्य आणि सरासरीपेक्षा सामान्य अशा स्वरुपाचा पाऊस असेल, असे सांगण्यात आले आहे.