या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान विभागाच अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । मुंबईच्या हवामान विभागाने आता महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह इतर जिल्ह्यांना हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे. मुंबई हवामान विभागाने पावसाच्या अंदाजाबाबत त्यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

नाशिक, सोलापूरसह उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. यासोबतच वेगवान वारेही वाहतील. जवळपास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाच्या मुंबईच्या रडारवरील दुपारी २.४५ ची अपडेट होसळीकर यांनी आणखी एका ट्विटमध्ये दिली आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील उत्तर भागात पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यावर पावसाचे ढग जमा होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *