महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात आजपासून पुन्हा सहा रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 85 वरून 91 रुपये झाला आहे.
आयात करण्यात येत असलेल्या गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत एप्रिलपासून सीएनजी महागत चालला आहे. एप्रिलमध्ये व्हॅट कमी झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र त्यानंतर दोन टप्प्यात दरवाढ होत पुन्हा सीएनजी 73 रुपये किलो झाले होते. त्यानंतर टप्याटप्याने वाढ होत आता सीएनजी 91 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या पाच महिन्यात सीएनजी 29 रुपयांनी वाढला आहे.