महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडीच्या कोठडीमध्ये आहे. राऊत यांची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळतो की कोठडी वाढते हे पाहण्याचे ठरणार आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. 9 तास रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली गेली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्ट रुम नंबर 16 मध्ये विशेष इडी न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आणि ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने राऊत यांना ३ दिवसांची कोठ़़डी दिली. आज कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल.