मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात झळकलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा ; निष्ठेचे दुसरे नाव…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । निष्ठेचे दुसरे नाव जितेंद्र आव्हाड… असे लिहिलेले बॅनर सध्या ठाणे शहरात ठिकठिकाणी झळकलेले पाहायला मिळाले आहे. माजी गृहनिर्माण मंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात तसेच कळवा मुंब्रा परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनरमध्ये अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला वैचारिक वादातून रामराम ठोकत बंड पुकारला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाला समर्थन दिले. मात्र या बंडानंतर शिंदे गटातील अनेक समर्थकांना गद्दार नाव ठेवण्यात आले. त्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात लागलेल्या बॅनरवर निष्ठेचे दुसरे नाव डॉ. जितेंद्र आव्हाड असे लिहून हा टोला शिंदे समर्थकांना लगावण्यात आला की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनरमुळे आता पुढील काळात ठाण्यात बॅनर वॉर पाहायला मिळणार अशी चिन्ह आहेत. कारण आता ठाण्याताल दहीहंडी उत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. दहीहंडी आणि गणेसोत्सवासह ठाणे महापालिका निवडणुकीवेळी हे बॅनर वॉर रंगण्याची चिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *