आता माणुस हवेत उडणार ; माणसाला घेऊन भरारी घेणारा ड्रोन पुण्यात तयार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । आजच्या आधुनिक युगात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. त्यातच ड्रोन नावाच्या प्रकारामुळे अवकाशातून जमिनीवरची कोणतीही गोष्ट माणूस सहज पाहू शकतो. आतापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून शेतीत फवारणी केल्याचे आपण पाहिले. त्यानंतर ते भारतातही सुरू झाले. मात्र, तुम्ही माणसाला घेऊन उडणारा ड्रोन तुम्ही पहिला आहे का? होय माणसाला घेऊन उडणारा ड्रोन. भारतातील माणसाला घेऊन उडणारा पहिला ड्रोन तयार करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील सागर डिफेन्स इंजिनिअरींकग कंपनीकडून हा ड्रोन तयार करण्यात आला आहे. पुण्यात या ड्रोनची यशस्वी चाचणी झाली. आता या ड्रोनने माणसाला उडता येणार असून या ड्रोनची पहिली चाचणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्यात आली होती.

चाकण औद्योगिक वसहतीमध्ये असणार्‍या सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने हा ड्रोन तयार केला आहे. कंपनीच्या इंजिनीअर्सनी चार वर्षाच्या अथक मेहनतीतून, खास भारतीय सैन्य दलाच्या मदतीतून हा तयार करण्यात आला आहे.

वाहून नेण्याची क्षमता…
हा ड्रोन १३० किलो इतके वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे सहज शक्य आहे. तसेच संकटाच्या किंवा मेडिकल एमर्जन्सीमध्ये देखील या ड्रोनचा उपयोग केला जाऊ शकतो. हा ड्रोन २५ किमीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. या ड्रोनची उड्डाण वेळ २५ ते ३३ मिनिटे इतकी आहे. नौदलाकडून सागर डिफेन्सला हा प्रकल्प मिळाला होता.

सरकारकडून अर्थ सहाय्य….
शेतकर्‍याने आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *