महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी संघटने च्या वतीने “निर्धार महा विजयाचा , संवाद कार्यकर्त्यांचा “ या मेळाव्यात ओबीसी आरक्षण पूर्ववत केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचा फुले पगडी , घोंगडी व आसूड देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे , महिला अध्यक्ष कविता आल्हाट , ओबीसी संघटना महिलाध्यक्ष सारिका ताई पवार ,मा.सतीश दरेकर, सचिन आवटे, सतीश चोरमले, सुदाम शिंदे ,पी के महाजन, प्रकाश आल्हाट ,प्रदीप आहेर, विशाल जाधव,विशाल आहेर आदी उपस्थित होते.
आजच्या या संवाद सभेतील अजितदादांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण झाले.यावेळी बोलत असताना श्री विजय लोखंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याबद्दल अजित दादांचे आभार मानले.