महाराष्ट्र 24 । पुणे : शहरातील ज्या परिसरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काल (ता.२२) रात्री उशीरा काढले. केवळ दुध विक्री केंद्रे सकाळी १० ते १२ या दोन तासासाठी सुरू राहणार आहेत.
इतर सर्व आस्थापना (किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन अंडी, व इ-कॉमर्स यांची दुकाने व वितरण सेवा पुर्ण बंद राहतील) आज (ता.२२) सकाळपासून उद्या रात्री १२ पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. दुधाच्या वाहतूकीवर बंधन राहणार नाही. मात्र, घरी जाऊन दूध वितरणावर बंद असेल.
पहा प्रतिबंधित पोलिस ठाणे व त्यांचे भाग
समर्थ पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
खडक पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
फरासखाना पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट
बंडगार्डन पोलिस ठाणे – ताडीवाला रोड
दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
येरवडा पोलिस ठाणे – लक्ष्मीनगर, गाडीतळ
खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
कोँढवा पोलिस ठाण्याचा पूर्ण भाग
वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ व २८