महाराष्ट्र 24 । पुणे : पुण्यामध्ये गेल्या १२ तासात नवीन ५३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता ९३४ झालेली आहे . पुण्यात आत्तापर्यंत ५९ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनामुळे गेल्या ३६ तासात १२१ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे पुण्यातील संचारबंदी आणखी कडक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.