महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन पहिले सुरत आणि मग गुवाहाटीला गेले, यानंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे.
आंध्र प्रदेश मधील तिरुमला तिरुपती बालाजी सिद्ध देवस्थानचे अध्यक्ष श्री.वाय.व्ही.सुब्बा रेड्डी यांची उपमुख्यमंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली.@TTDevasthanams #Tirupati #Tirumala #TirupatiBalaji pic.twitter.com/e1tk6GRLtV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 5, 2022
देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 5 ऑगस्टला शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यांची भेट घेतली. समितीचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटले आणि त्यांचा सत्कार केला, तसंच त्यांना भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं.
I am honoured to have been able to successfully request the Tirupati Temple Trust to have a temple of the Lord in Navi Mumbai, Maharashtra, with land allotted in April 2022. pic.twitter.com/1zINfmpEW9
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2022
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर देवस्थान समितीचे विश्वस्त ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर त्यांची भेट आदित्य ठाकरे यांच्याशी झाली, यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर हे तिरुमाला देवस्थान समितीचे सदस्यही आहेत.
21 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मंदिराच्या भुमीपूजन सोहळ्याला एकाच व्यासपीठावर येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या दोघांनी कार्यक्रमाला हजेरी लावली तर शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र दिसतील.