Sanjay Raut: संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनाचा मार्ग मोकळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । संजय राऊत यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली. 22 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Sanjay Raut sent to 14 days judicial custody)

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळावे अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना संबंधित औषधं उपलब्ध करुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 8 ऑगस्टपर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते. आज ईडीची कोठडी संपत असल्यानं संजय राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आलं होतं. ईडीने त्यांची कोठडी न मागितल्याने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला. यानंतर आता संजय राऊतांचा जामिनीसाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *