महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे….. डावलण्यात आलेल्या पंकजा मुंडेंचे मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिलं ट्विट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या विस्तारात पंकज मुंडें याना डावलण्यात आलं आहे. सर्वत्र या गोष्टीची चर्चा होत असतानाच पंकजा यांनी ट्वीट केले आहे.(Pankaja Munde first tweet after Eknath Shinde Cabinet Expansion)

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली. आणि पंकजा मुंडेच्या पत्ता कटच्या चर्चेला उधाण आल.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. ‘नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *