Bihar Politics: … म्हणून आम्ही शिवसेना फोडली ; अखेर भाजपाच्या बड्या नेत्याच्या तोंडी सत्य आले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । मंगळवारी नितीशकुमार यांनी भाजप आणि एनडीएसोबतचे संबंध संपुष्टात आणल्याची घोषणा केल्याने बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला. नितीश यांनी सात पक्षांच्या ‘महाआघाडी’सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात तेजस्वी यादव यांचा राजद आणि इतर विरोधी पक्ष आहेत. आज नितीश यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. नितीश यांच्या ‘खेळी’नंतर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नितीश यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची दोनदा भेट घेतली. पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्या बैठकीत महाआघाडीसोबत संयुक्त संख्याबळाच्या जोरावर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचा दावा केला.

बिहारचे ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राजदसोबत भाजपमध्ये असताना त्यांना (नितीश कुमार) यांना जो सन्मान मिळाला होता, तो मिळणार नाही. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम ते भोगत आहेत.

‘2024ला भाजप प्रचंड बहुमताने येणार!’

सुशील मोदी म्हणाले की, जेडीयू युती तोडण्यासाठी निमित्त शोधत होती. सुशील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “नितीशजींच्या संमतीशिवाय भाजपने आरसीपींना मंत्री केले हे शुद्ध खोटे आहे. भाजपला जेडीयूत फूट पाडायची होती हेही खोटे आहे. ते युती तोडण्यासाठी निमित्त शोधत होते. 2024 ला भाजप प्रचंड बहुमताने येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *