Gold-Silver Price : आज सोने-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,३५० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५८,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५८७ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *