Asia Cup पुर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये (Asia Cup) 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. कारण पाकिस्तानचा स्टार खेळाडूला दुखापत झाल्याची घटना घडलीय. या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय.

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (shaheen afridi) गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीत तो अद्याप सावरला नाहीए. त्यामुळे शाहिन आफ्रिदी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने (babar azam) हे मान्य केले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) म्हणाला की, आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत. आमचे डॉक्टर शाहीन आफ्रिदीची पूर्ण काळजी घेत आहेत.दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ हवा आहे. आफ्रिदीच्या फिटनेस आणि आरोग्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आशिया चषकापर्यंत तो बरा असावा अशी आमची इच्छा असल्याचे बाबर म्हणालाय.

बाबर आझम (babar azam) पुढे म्हणाला, आशिया चषक स्पर्धेतील आपला प्रवास भारतासारख्या संघासोबत सुरू होणार आहे आणि हा सामना त्याच्यासाठी खूप दबावाचा असणार आहे. मात्र संघाच्या वेगवान गोलंदाजीवर पूर्ण विश्वास असल्याचे मत बाबरने व्यक्त केलं आहे.

वेगवान गोलंदाज
आशिया चषकासाठी पाकिस्तानने शाहीन आफ्रिदीशिवाय (shaheen afridi) आणखी चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. पाकिस्तान संघात हरिस रौफ व्यतिरिक्त शाहनवाज धाहानी, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान शाहीन आफ्रिदी (shaheen afridi) हा पाकिस्तानचा संघाचा महत्वपुर्ण गोलंदाज आहे. त्याची दुखापत बरी न झाल्यास पाकिस्तानसाठी आशिया कपचा प्रवास कठीण असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *