महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । सलमान मुल्ला । उस्मानाबाद । पोलीस दलातील पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार केला जात असून जुलै 2022 या महिन्यात बेस्ट पोलीस स्टेशन म्हणून कळंब पोलीस स्टेशन तर बेस्ट उपविभाग- कळंब उपविभागाचे मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री एम. रमेश यांना गौरविण्यात आले..
तर कळंब पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी 189 प्रतिबंधक कारवाई आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
वरील सर्व पोलीस अधिकारी यांचा दि. 12 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहाते मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी- अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.