Mohit Kamboj : फडणवीसांच्या भेटीनंतर मोहित कंबोज म्हणाले, अरे भावा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । भाजपचे नेते मोहित कंबोज आणि पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मोहित कंबोज यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केलं आहे.(Mohit Kamboj Meet Deputy Cm Devendra Fadnavis Talks About Reason)

कंबोज हे सागर बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांची भेट घेण्याचं नेमकं कारण? अशा प्रश्न माध्यमांना विचारलं असता. “अरे भावा, आज त्याचं अभिनंदन करण्यासाठी मी आलो होतो. ते भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य झाल्याबद्दल मी अभिनंदन करण्यासाठी आलो होतो,” असं उत्तर दिले.

कंबोज हे मागील काही तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते कारागृहात जाणार, असं ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अचानक फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विरोधीपक्षाचे नेते तुम्ही ईडीचे अधिकारी आहात अशी खोचक टीका करताना दिसत आहेत, असंही कंबोज यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, “काही हरकत नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन,” असं म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच कारागृहात जाणार असल्याचा सूचक इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून देण्यात आला होता. त्यानंतर तो बडा नेता म्हणजे अजित पवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना अद्याप क्लिनचीट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *