महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । ठाकरे सरकार अल्पमतात आणून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवसी सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल. दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.आज शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मुद्दा गाजणार?
15 सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.