महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. याच मुहूर्तावर सोने (Gold) किंवा चांदीची (Silver) खरेदी केली जाते. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात सध्या प्रचंड अस्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याचा दर स्थिर असून चांदीचे दर घसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.
जन्माष्टमीनिमित्त अनेक जणांचा सोने खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे सोने चांदीच्या दरावर सर्वांचे लक्ष असणार. आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,250 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 567 रुपये आहे.
24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
चेन्नई – 52,770 रुपये
दिल्ली – 52,400 रुपये
हैदराबाद – 52,250 रुपये
कोलकत्ता -52,250 रुपये
लखनऊ – 52,400 रुपये
मुंबई – 52,250 रुपये
नागपूर – 52,280 रुपये
पूणे – 52,280 रुपये