पुण्यात दहीहंडीत पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याचा तरूणावर कोयत्याने वार, हवेत गोळीबार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । दहीहंडीच्या जल्लोष उत्साहात असताना पुण्यात सिंहगड रोड परिसरात नाचत असताना पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारधार शस्त्राने वार केले. तर यातील एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री वडगाव भागात घडली. शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर वडगाव ) असे जखमी झाल्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओंकार लोहकरे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वासात ते साडेसातच्या सुमारास तुकाईनगर परिसरात असणाऱ्या कॅनॉल शेजारील रस्त्यावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *