महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । पावसाळी अधिवेशनामध्ये शिंदे सरकार आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या करुणा शर्मा प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टोलेबाजी केली होती. पण, त्यांच्या या टीकेमुळे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. वैयक्तिक आरोप कुणीच करू नये, विधिमंडळाच्या कामाचा दर्जा राखावा, अशी मागणी अजितदादांनी केली. तसंच, यावेळी सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर बोलणं अजितदादांनी टाळलं.
पावसाळी अधिवेशनामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून सत्ताधारी शिंदे गटाच्या नाकीनऊ आणले. धनंजय मुंडे यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी करून मुख्यमंत्री शिंदे यांना डिवचले होते. आज अधिवेशनात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून या वादावर भाष्य केलं.
‘माझं मत आहे की, वैयक्तिक कोणीही टीका करू नये. आम्ही सगळ्यांनी गेली अडीच वर्ष काम केले. आरोप होत असता. पण वैयक्तिक कोणीच आरोप करु नये. विधीमंडळ कामाचा दर्जा राखावा. 20 जूनला काही वेगळ्या घटना घडल्या आणि वेगळं राजकारण घडलं, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली.
मधल्या काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी गोविंदांना मदत करण्याची घोषणा केली होती. पण गोविंदांना कुठेही मदत मिळाली नाही. घोषणा केल्यानंतर विमा कंपन्यातर्फे 10 लाख देण शकतं नाही.अजय चौधरी यांनी पण एक मुद्दा मांडला की काही गोविंदा जखमी आहेत त्यांना मदत करावी. किमान सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे, असंही अजितदादा म्हणाले.
पूरग्रसतांबदल जे काही प्रश्न आहे तर त्या सगळ्यांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. सगळ्यांचं एकमत नुकसानावर झालं आहे. शेतकरी पुन्हा उभा कसा राहिल. आता सरकार यावर काय जाहीर करेल माहित नाही. जे कोणी भूमिका मांडतील त्यावर राईट टू रिप्लाय आहे. आमदारांनी दिलेल्या मागण्यांवर न्याय कसा मिळेल यावर चर्चा होईल, असंही अजितदादा म्हणाले.
आज महाविकास आघाडी सरकारची बैठक आहे. 5:30- 6:00 वाजता ही बैठक आहे विधानभवनामध्ये होणार बैठक आहे. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. आज ठरलं की सगळ्यांनी एकत्रित बसून बैठक घ्यायची आहे. आमच्यामध्ये आम्ही ऐकी ठेवण्याचं काम करत आहोत. आम्ही राहिलेले आमदार आहोत त्यांच्या मध्ये उत्साह निर्मण करणार आहोत, असंही अजितदादा म्हणाले.