टीव्ही पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : सध्या दूरदर्शनची चर्चा जोरदार सुरू आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे दूरदर्शनला ‘अच्छे दिन’ आले आहेत. रामायण, महाभारत, चाणक्य, ब्योमकेश बक्षी, शक्तिमान अशा अनेक मालिका पुनरप्रक्षेपित करण्यात येत आहेत. ज्यामुळे नवी पिढी देखील दूरदर्शन सोबत जोडली गेली आहे. दूरदर्शनसह देशातील तमाम लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. कारण 25 एप्रिल 1982 रोजी दूरदर्शनवर प्रथमच रंगीत चित्र दाखवण्यास सुरुवात करण्यात आली होती. या आधी दूरदर्शन वाहिनीवरून केवळ कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसायचे. 25 एप्रिल 1982 रोजी पहिली टेस्ट करण्यात आली होती. दूरदर्शनच्या सोशल हँडलवरून ही माहिती आज प्रसिद्ध करण्यात आली, त्यानंतर दूरदर्शनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

38 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 1982 मध्ये दूरदर्शनवर कृष्णधवल मालिकांऐवजी रंगीत मालिका दाखवण्यासाठीचे पाहिले पाऊल पडले. त्याचबरोबर दूरदर्शनचा लोगो देखील रंगीत झाला. ती फिल्म देखील दूरदर्शनने आपल्या सोशल हँडलवर प्रसिद्ध केली आहे. या फिल्म मध्ये आकाशगंगेसारख्या आकारातून दूरदर्शनचा लोगो तयार होतो. त्याखाली सत्यम, शिवम, सुंदरम असे संस्कृत शब्द झळकतात. मागे अत्यंत शांत संगीत सुरू असते. ही फिल्म पाहताना दर्शक पुन्हा एकदा जुन्या काळातील आठवणीत रममाण होतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *