महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । आज सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेची दुसरा टप्पा आज संपणार आहे. केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेची दुसरा टप्पा 22 ऑगस्टपासून सुरू झाला होता.
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गोल्ड बाँडची किंमत निश्चित करते. दुसऱ्या टप्प्यासाठी त्याची किंमत 5,197 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा पहिला टप्पा जून महिन्यात पार पडला होता.
गोल्ड बॉन्डची इश्यू किंमत इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या बंद किंमतीच्या सरासरी मूल्यावर आधारित आहे. यासाठी, सबस्क्रिप्शन कालावधीच्या आठवड्याच्या आधीच्या 03 कामकाजाच्या दिवसांच्या किमती आधार म्हणून घेतल्या जातात. जूनमध्ये आलेल्या या आर्थिक वर्षाच्या पहिल्या टपप्यासाठी गोल्ड बॉन्डची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. तर, दुसऱ्या सीरिजमध्ये याची किंमत 106 रुपये अधिक आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत ऑनलाइन पैसे ठेवले, तर त्याला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्यात येणार असून, या व्यक्तींना केवळ 5,147 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने खरेदी करता येणार आहे. या बाँड योजना आठ वर्षांसाठी वैध असून, पाचव्या वर्षानंतर हे कधीही विकता येणार आहेत. सार्वभौम गोल्ड बॉन्डची खरेदी करण्यासाठी रोख, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. रोखीने या बॉन्डीची रोखीने खरेदी करण्यासाठी 20 हजारांची मर्यादा आहे.
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत कोणीही एक ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकतो. कोणत्याही एका आर्थिक वर्षात सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेत जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करता येते. अविभाजित हिंदू कुटुंबे आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा २० किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे बॉन्ड रिझर्व्ह बँकेकडून सरकारच्या वतीने जारी केले जातात. हे बँका (लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकतात.