येत्या आठवडाभरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार ? इतके भाडेवाढ होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । पुण्यात रिक्षाचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबईतही Autorickshaw आणि टॅक्सीची भाडेवाढ अटळ मानली जात आहे. येत्या आठवडाभरात यासंबंधीचा निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास ३ ते पाच रुपयांनी महाग होईल, असा अंदाज आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून यासंदर्भात मुंबई मेट्रोपोलिअन रिजन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीसमोर प्रस्ताव मांडला जाईल. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिक्षा संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. रिक्षाचे किमान भाडे सध्या २१ रुपये इतके आहे. भाडेवाढ झाल्यास किमान भाडे २४ रुपये इतके होईल. तर टॅक्सीच्या भाड्यात ४ ते ५ रुपयांची वाढ होईल. या भाडेवाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजीच्या दरात झालेली वाढ. गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीचा प्रतिकिलो दर ४९.४० रुपयांवरून ८० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडेवाढीची मागणी करत आहे. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली होती.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यात रिक्षाच्या भाडेवाढीचा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी नागरिकांना आता २५ आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रूपये मोजावे लागणार आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून सीएनजीचा दर वाढतच आहे. या परिस्थितीमुळे रिक्षाचालक आणि मालकांमध्ये संताप पाहायला मिळत होता. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांच्या उत्पनातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घर चालवायचे कसे असा प्रश्न रिक्षाचालकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ झाली होती.

या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत सीएनजीचे दर २८.८० रुपयांनी वाढले आहेत. पुण्यात सुमारे ९० हजार रिक्षा धावतात. त्यांमध्ये सुमारे ४० टक्के रिक्षा नव्याआहेत. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीएनजीची सक्ती केली आणि त्यानुसार रिक्षाचालकांना सीएनजीवर रिक्षा चालवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नव्हता. रिक्षा चालकांना ९१ रुपये प्रति किलो इतक्या दराने सीएनजी मिळत आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *