जळगांव भेंडवळ येथे साडेतीनशे वषार्पासून घटमांडणी ; सोशल डिस्टंसिग चे पालन करत चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ! जळगांव ! विशेष प्रतिनिधी ! गणेश भड! जळगांव जा.तालुक्यातील ग्राम भेंडवळ येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. यामध्ये आजपर्यंत खंड पडला नाही, संपुर्ण देशातील 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. भेंडवळ घटमांडणी चे भाकीत अखेर आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले. यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार असून भरपूर पाऊस होणार आहे. पीक परिस्थिती साधारण राहील .तर अतिवृष्टी भरपूर होईल .देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणाऱ्या संकटासी लढा करावा लागेल,असे भाकीत भेंडवळ घटमांडणी केले आहे.

पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे. यावर्षी कुलदेवतेचा प्रकोप देशावर आहे. तर जनमानसावर तसेच पिकांवर सुद्धा रोगराई चे कमीअधिक प्रमाण राहील. परकीय शत्रूपासून घुसखोरी आतंकवादी कारवाया सुरू राहतील. साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. प्रचंड अतिवृष्टी होईल .भूकंप त्सुनामी सारखी संकटे देशावर सांगितली आहेत. चारा पाण्याची टंचाई भासणार आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु त्यांच्यावर खूप ताण येईल .या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल त्यामुळे देशाची आर्थिक तिजोरी खाली होऊन देश आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे आजच्या भाकितमधून वर्तविली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *