महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,२५० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,५४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,५७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५४० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)